महासरकारी शेतकरी योजना

 : नमस्कार मित्रांनो, आज आपण दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेसंदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यप्रद्धती, कोणत्या जिल्ह्यांसाठी हि योजना राबवली जाणार आहे, शासन निर्णय, या योजनेसाठी प्रकल्प किंमत, लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखात तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

या योजनेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत चा प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे घेता येणार आहे. ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप करण्यात येणार आहे.



सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.

२. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दि.११/२/२०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

३. प्रणालीमार्फत SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नाविन्यपूर्ण योजना 2023 ऑनलाइन अर्ज

याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.१३.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून ते दि.११.०१.२०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत असणार आहे.

सूचना

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आलेली आहे

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५ – २६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.

सन २०२२ – २३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी दि. २३/०१/२०२३ ते दि. ३०/०१/२०२३ या कालावधीमध्ये “कागदपत्रे अपलोड करा” या ठिकाणी आपली कागदपत्रे अपलोड करावीत.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून पुढील ५ वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कृपया अचूक आणि योग्य कागदपत्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यावी.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

नाविन्यपूर्ण योजना 2023 अर्ज कसा व कुठे करावा?

योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल अँप उपलब्ध करण्यात आलेले आहे.

त्यामुळे अर्ज करण्यासाठी AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.

आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१-२२ मध्ये AH-MAHABMS मोबाइल App डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

अर्जदारांनी अर्ज करते वेळी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे.

तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील.

एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.

नाविन्यपूर्ण योजना 2023 लाभ कोण घेऊ शकते?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना हि योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


नाविन्यपूर्ण योजना मार्गदर्शक सूचना

सन २०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष गृहीत म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर गृहीत धरण्यात येईल.

अर्ज करण्यापूर्वी कृपया योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी पहावी.

उपलब्ध अर्जांची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेवून योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता पडताळून अर्जदारांनी अर्ज करावा.

अर्जदाराला लाभ देण्याच्या अटी कोणत्या?

सन २०२२-२३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद लाभार्त्याने घ्यावी.


नाविन्यपूर्ण योजनेची कार्यप्रक्रिया काय आहे?

अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल.

योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने Text SMS प्राप्त होतील. तसेच प्रणालीवर सूचनाही प्राप्त होतील.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

नाविन्यपूर्ण योजना टोलफ्री नंबर काय आहे?

आम्ही या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा संपूर्ण प्रयत्न या लेखात केलेला आहे. अद्याप तुम्हाला काय शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळावू शकता. योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

🤙🤙कॉल सेंटर संपर्क – १९६२ (१०AM to ६PM).

टोल फ्री संपर्क -१८००२३३०४१८ (८AM to ८PM).

नाविन्यपूर्ण योजना महत्वाच्या लिंक्स

नाविन्यपूर्ण योजना वेबसाईट – https://ah.mahabms.com/


बंधपत्राचा नमूना डाउनलोड करा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Berojgari Bhatta Maharashtra 2023 (Registration) : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 मराठी | महाराष्ट्र शासन देणार 5000 रुपये दरमहा

भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

महिला, मुलींसाठी योजना