PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना 2022 बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये योजनेचे उद्दिष्टे, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, लाभ, अर्ज कुठे करायचा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत,
(प्रधानमंत्री लोन योजना 2022,)
या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी 10- 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे, आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने PMEGP लोन योजनेचा लाभ घेता येणार आहे,
PMEGP योजना 2022 अंतर्गत अधिकाधिक बेरोजगार तरुणांना कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून देणे याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे.
PMEGP योजना अनुदान रक्कम
सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 15% ग्रामीण क्षेत्रासाठी खर्चाच्या 25% तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 10% किमती स्वतःचे योगदान असणार आहे
या योजनेचा लाभ पुढीलपैकी व्यक्ती घेणार आहेत
SC,ST,OBC, अल्पसंख्याक, महिला ,शारीरिक अपंग, भूतपूर्व सैनिक इत्यादी.
शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्पाच्या 25% खर्च ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 35% एकूण प्रकल्प खर्चाच्या 5% स्वतःचे योगदान असणार आहे,
PMEGP योजना 2022 चे फायदे
*देशातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग रोजगार सुरू करण्यासाठी 10-25 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल *
या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांची जात व ग्रामीण, शहरी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते
*शहरी भागातील PMEGP साठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्र डी आय सी आहे, तर ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योग मंडळाला kvc संपर्क साधता येईल.
*लोन अशाच बेरोजगार तरुणांना देण्यात येईल, ज्यांना स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे,
PMEGP योजना 2022 द्वारे कोणत्या प्रकारचे उद्योग स्थापित केले जाऊ शकतात,
PMEGP लोन योजना 2022 अर्ज करून लाभ कोण घेऊ शकतात?
*अनुसूचित जाती ( SC)
*माजी सैनिक
*दिव्यांग
*महिला
*अनुसूचित जमाती (ST)
*इतर मागासवर्ग( OBC)
*पूर्व उत्तर राज्यातील लोक
*अल्पसंख्यांक
*सीमा वरती भागात आणि डोंगरावर राहणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात
PMEGP योजना 2022 ची पात्रता
*अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा
*अर्जदाराची किमान 8वी पास असणे आवश्यक आहे
*अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे
*जर अर्जदारास आधीपासूनच आणि अनुदान योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा परिस्थितीतही तो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना 2021 घेण्यास पात्र राहणार नाही,
*या योजनेअंतर्गत हे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील देण्यात येईल हे कर्ज जुन्या व्यवसायाला पुढे चालू ठेवण्यासाठी दिले जात नाही,
*कोणत्याही सरकारी संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीस या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
*सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्था नाही या योजनेचा लाभ मिळणार आहे,
PMEGP कर्ज योजना 2022 साठी कागदपत्रे
*अर्जदाराचे आधार कार्ड
*मोबाईल नंबर
*पासपोर्ट आकाराचा फोटो
*पॅन कार्ड
*जात प्रमाणपत्र
*शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
PMEGP लोन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.kviconline.gov.in/ला अवश्य भेट द्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा