News

 

CM Eknath Shinde News : राज्यभरात आम्ही 'सावरकर गौरव यात्रा' सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराहुल गांधींचा निषेध आणि सावरकरांचा गौरव करण्यासाठी आता राज्यभरात यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी राहुल गांधींचा निषेध केला आहे.

शिंदे म्हणाले, "राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल आता सगळा देश रस्त्यावर उतरला आहे. विधानसभेच्या प्रांगणातही आमच्या आमदारांनी याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्याबाबत असलेली ती चिड आहे.

राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? CM शिंदेंचा ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, "मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत.

सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही सुरू करत आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वारंवार केलेल्या अपमानाचा आम्ही यामध्ये निषेध करू."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Berojgari Bhatta Maharashtra 2023 (Registration) : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 मराठी | महाराष्ट्र शासन देणार 5000 रुपये दरमहा

भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

महिला, मुलींसाठी योजना