सकारात्मकता आणि मनाचे व्यायाम
सकारात्मकता आणि मनाच्या व्यायाम आज आपण हा टॉपिक पाहणार आहोत.
मित्रहो आपलं मन अतिश्य चंचल आणि संवेदनशील असते. त्यात पुन्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीबाबत लगेच निष्कर्ष काढून स्वतःला त्रास करून घेण्याची किंवा त्याचबरोबर इतरांनाही त्रास देण्याची नेहमीच,घाई असते. कुठलीही गोष्ट नीट समजावून न घेता. त्यावर टीका टिपणी करण्यासाठी आपण नेहमी आतुर झालेलो असतो. त्यातून सकारात्मकता आणि विधायक गोष्टी घडण्याऐवजी गुंतागुंत वाढते आणि मानसिक तणावही निर्माण होतो हे टाळण्यासाठी वारंवार स्वतःला काही गोष्टी बाबत बजावत राहिले पाहिजे .त्यालाच आपण मनाचे व्यायाम म्हणू शकतो. अशा या मनाच्या व्यायामातून आपले व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता निर्माण होऊन आनंद आणि समाधान मिळू शकते
मनाला काय सांगणार
* माझं आतलं विष मी कायम शांत, स्वस्त, आनंदी आणि कणखर ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन
* आयुष्यात घडणाऱ्या विपरीत त घटना अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्वीकारेल.
* आयुष्य खूप सुंदर आहे. त्या प्रत्येक क्षणाचा मी चांगल्या पद्धतीने आनंद व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्य मला मिळवता येतील.
* स्वतः आनंदी राहण्याचा मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करीन तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन.
* चांगली मूल्य जोपासन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही.
* माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी मी करेन.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा