कुटुंब

 नमस्कार मित्रहो आज आपण कुटुंबावर ती चर्चा करणार आहोत कुटुंब म्हटल्यानंतर पूर्ण परिवाराला परिवारामध्ये आई वडील भाऊ बहीण काका काकू आजोबा आजी या सर्व जणांना मिळून आपलं कुटुंब तयार होतो मित्रहो आताच्या पिढीमध्ये कुटुंब राहिलेलं नाहीये कुटुंब आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये कुटुंब म्हणजे हमदो हमारे दो असं आहे मित्रहो आपण पाहिला असेल की जुन्या लोकांमध्ये पैशाचे प्रमाण खूप कमी होतं पण माणसांमध्ये माणुसकी खूप प्रमाणामध्ये होते पण आता सध्या असा प्रकार आहे माणसांमध्ये कॉम्पिटिशन लागलेला आहे माणसांमध्ये स्पर्धा लागलेली आहे या स्पर्धेमध्ये कोण जास्त पैसा कमावत आहे कोण किती कमवत आहे कोण कोणत्या पद्धतीने पैसा कमवत आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे मित्रहो आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण मामाच्या गावाला जात होतो तिथेच गेल्यानंतर आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद असायचा पण आता या गोष्टी कुठेही राहिलेल्या नाहीत मला आठवत आहेत मी ज्यावेळेस माझ्या मामाच्या गावी जात होतो गावी गेल्यानंतर मला खूप आनंद व्हायचा कारण मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहायला जायचं शेतामध्ये आंबे खायला जायचं त्यानंतर आम्ही सगळे मामाची मुलं मी पार्टी करतो पार्टी म्हणजे आम्ही एक एक रुपया जमा करायचं आणि त्यामध्ये आम्ही मुरकुल किंवा फरसाण हे जमा करून आम्ही पार्टी करायचं पण आत्ताची पिढीमध्ये या गोष्टी राहिलेल्या नाहीत मित्रा कारण आता कुटुंबच राहत नाहीयेत आता प्रत्येकाला वाटते हम दो हमारे या पिढी मध्ये कोणालाच कुटुंब मध्ये जास्त लोक नको आहेत त्या मुळे कुटुंब विखुरले जात आहेत मित्रहो आपण जर पूर्ण परिवार जपला नाही तर आपल्या मुलांना आजी आजोबा काका काकू मामा मऊशी हे कळणार नाही त्या मुळे आपण जितकं त्यांना सांगू तितका त्यांना ह्या गोष्टी वेगळ्या वाटतील त्या मुळे कुटुंब जपा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Berojgari Bhatta Maharashtra 2023 (Registration) : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 मराठी | महाराष्ट्र शासन देणार 5000 रुपये दरमहा

भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

महिला, मुलींसाठी योजना