जीवनाविषयी काही कटू सत्य

 मित्रांनो आज आपण आपल्या जीवनावरती चा टॉपिक पाहणार आहोत.


 *प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक व्यक्तीला या जगात पर्याय आहे. अगदी तुम्हालाही पर्याय आहे.

* सातत्यपूर्ण सराव आणि प्रयत्न नसतील तर तुमच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभेला काहीही किंमत नसते.

* मृत्यू पंथाला लागल्यावर तुमची कामगिरी आणि यशाला काही एक किंमत नाही.

* काही व्यक्ती आणि घटना तुमच्यासाठी  हानिकारक असतात आणि त्यांच्यापासून दूर जाण्यालाच महत्त्व असते.

* आनंद शोधण्यासाठी तुम्ही जी सततची धाव धाव करत असता त्यामुळेच आनंदाच्या क्षणांना तुम्ही परखे होतात.

* प्रत्येक जण पतंग उडवत असतो कोणालाच माहीत नसते की आपण काय करत आहोत.

* तुमच्या बोलण्यापेक्षा तुमची कृती जास्त बोलकी असते स्व जवाबदारी सगळ्यांनाच महत्त्वाची असते.

* कोणीही कधीच परीपक्व नसतो आणि उगाच देखाव्याची भूमिका करतो त्यामुळेच तो जास्त फसला जातो.

* तुमचे आयुष्य किती कष्टदायी आहे हे कोणालाच पडलेलं नसतं.

* तुमच्याकडची संपत्ती तुम्हाला अधिक चांगली व्यक्ती किंवा आनंदी बनवू शकत नाही.

* या जगात तुम्हाला एकच व्यक्ती आनंद बनू शकते ते म्हणजे तुम्ही स्वतः तुम्ही दुसरी कोणाकडेही अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्याने माणूस जास्त दुखी होतो.

* 99 टक्के लोकांना फक्त यश दिसते त्यामागे कठोर महिन्यात आणि अंधारा रात्री काढलेल्या किंवा जागलेल्या कोणालाही दिसत नाहीत त्यांना फक्त तुमचं यश दिसतं त्यामागे तुम्ही कितीतरी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केलेले आहे या गोष्टीचा कोणाला एकही फरक पडत नाही.

* तुमच्यापेक्षा चांगली कामगिरी करणारा व्यक्ती या जगात कोणीतरी  असतोच.

* तुमच्या जवळच्या व्यक्ती पेक्षा तुम्ही कठोर मेहनत केली तर शक्यता अशी असते.की तुम्हाला काही मित्र गमवावे लागतात तुम्हाला वाटते तितके सगळे चांगले  नसते.

* बहुतेक  लोक चांगले जीवन जगू शकत नाहीत कारण अमर्यादा हाव ठेवल्याने माणूस कधीच सुखी राहत नाही.

* दिवसेंदिवस तुमच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही त्यामुळे आजच कृती करा आणि प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Berojgari Bhatta Maharashtra 2023 (Registration) : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 मराठी | महाराष्ट्र शासन देणार 5000 रुपये दरमहा

भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

महिला, मुलींसाठी योजना