माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठी
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणाची खात्री देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला, हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये पर्यंत आहे आशा समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात येत आहे.
![]() |
या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार व्दारा बँक मध्ये जमा केले जाईल, त्याचप्रमाणे या योजने मध्ये ज्या माता किंवा पित्याने
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे, त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25000/--25000/- रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल, या योजनेच्या अंतर्गत सुरवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा